वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सध्या लॉकडाऊन आहे. यामुळे अनेक मजूर शहरी भागत अडकून पडले आहेत. हे मजूर आता महानगरातून आपल्या गावी परत जात आहेत. काही ठिकाणी तर मजूर पायी आपल्या गावी जात असल्याचे चित्र दिसत आहे. अशाच पायी जात असलेल्या मजुरांसाठी जिल्ह्यातील अनसिंग चेक पोस्टवर गावकऱ्यांकडून जेवण आणि औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे.
पायी गावी जाणाऱ्या मजुरांना अनसिंग चेक पोस्टवर जेवणासह औषधोपचार - वाशिममध्ये मजुरांना जेवणाचे वाटप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सध्या लॉकडाऊन आहे. यामुळे अनेक मजूर शहरी भागत अडकून पडले आहेत. हे मजूर आता महानगरातून आपल्या गावी परत जात आहेत. अशाच पायी जात असलेल्या मजुरांसाठी जिल्ह्यातील अनसिंग चेक पोस्टवर गावकऱ्यांकडून जेवण आणि औषधोपचाराची सोय करण्यात आली आहे.
गावी जाणाऱ्या मजुरांना अनसिंग चेक पोस्टवर जेवणासह औषधोपचार
कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे रोजगाराच्या शोधात महानगराकडे गेलेले ग्रामीण भागातील मजूर हजारोच्या संख्येने आपल्या गावाकडे परतत आहेत. सामाजिक भावनेतून या कष्टकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी, यासाठी वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील अनसिंग चेक पोस्टवर गावकऱ्यांकडून व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो मजुरांना याठिकाणी औषधोपचारासह जेवण मिळत आहे.