वाशिम- जिल्हा नियोजन भवन येथे मंगळवारी डीपीडीसी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित राहणार होते. दरम्यान, या बैठकीपूर्वीच शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये शाब्दीक वाद निर्माण झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात एक महिला गर्दीमध्ये असभ्य भाषेत बोलत असल्याचे ऐकू येत आहे.
खासदार गवळी आणि आमदार पाटणी यांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी
वाशिम जिल्हा नियोजन भवन येथे मंगळवारी डीपीडीसी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत उपस्थित राहणार होते.

खासदार गवळी आणि आमदार पाटणी
दरम्यान, मंगळवारी आमदार राजेंद्र पाटणी आणि खासदार भावना गवळी यांनी वाशिम शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. हा व्हायरल व्हिडिओ कुणाचा आहे याविषयी जिल्हाभर तर्कवितर्क लावले जात आहेत. हा व्हिडिओ त्याच घटनेचा आहे का याची जबाबदारी आम्ही घेत नाही. मात्र, हा व्हिडिओ नियोजन भवनमधला असल्याच्या चर्चा सध्या सुरू असून, त्यामुळेच तो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.