महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Buldana : नवरदेवाच्या आवाहनानंतर वऱ्हाड्यांनी घेतली लस; लग्नातून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न - बुलडाणा मुस्लीम नवदेव बातमी

कोरोनावर एकमात्र ही लस उपायकारक असल्याचे सांगून मी लवकरच माझ्या पत्नी सोबत लग्नानंतर कोविड लस घेणार असल्याचे उच्च शिक्षित नवरदेव मोहम्मद आमीर यांनी सांगितले. मोहम्मद आमीर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक वऱ्हाडींनी लग्न समारंभ आटोपल्यानंतर लग्न मंडपाच्या बाहेरच स्व.गुप्ता नगर परिषदेच्या शाळेच्या आवारात सुरू असलेल्या कोविड लसीकरण शिबिरांमध्ये जात लस घेतली.

Buldana muslim bridegroom appeal Vaccination
Buldana muslim bridegroom appeal Vaccination

By

Published : Dec 3, 2021, 5:09 PM IST

Updated : Dec 4, 2021, 9:07 PM IST

बुलडाणा - कोरोना लस घेण्यासंदर्भात समाजात गैरसमज (misundastanding about covid vaccine) पसरविण्यात आला होता. हा गैरसमज जनजागृतीच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न होत असला तरी अद्यापही अनेक जण लस घेण्यासाठी धजावत नाहीत. हा गैरसमज दूर करण्यासाठी बुलडाण्यात उच्च शिक्षित असलेले मुस्लीम नवरदेवाने स्वतःच्या लग्नात सामाजिक बांधीलकी जोपासून आपल्या लग्नसमारंभात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना लग्न लावणाऱ्या मौलवींच्या मदतीने कोविड लस घेण्यास आवाहन केले. कोरोनावर एकमात्र ही लस उपायकारक असल्याचे सांगून मी लवकरच माझ्या पत्नी सोबत लग्नानंतर कोविड लस घेणार असल्याचे उच्च शिक्षित नवरदेव मोहम्मद आमीर यांनी सांगितले. मोहम्मद आमीर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक वऱ्हाडींनी लग्न समारंभ आटोपल्यानंतर लग्न मंडपाच्या बाहेरच स्व.गुप्ता नगर परिषदेच्या शाळेच्या आवारात सुरू असलेल्या कोविड लसीकरण शिबिरांमध्ये जात लस घेतली.

प्रतिक्रिया

मौलवींनी केले लस घेण्याची आवाहन -

बुलडाण्यातील इकबाल चौकात राहणाऱ्या मोहम्मद अशापक यांच्या सिव्हिल इंजिनिअर असलेल्या मुलगा मोहम्मद आमीर यांचे लग्न त्याच भागातील राहणारे दिवंगत अब्दुल यांची कन्या निखत परवीन यांच्या सोबत बुधवारी 1 डिसेंबर रोजी गुप्ता नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत लावण्यात आले. लग्न समारंभात दोन्हीकडील वऱ्हाडी पोहचले होते. लग्नसमारंभात लग्न लावण्याच्या वेळी सकाळी व्यासपीठावर नवरदेव मोहम्मद आमीर पोहचल्यानंतर आमीरने लग्न लावणाऱ्या मौलवींना, लग्न मंडपाच्या बाहेर सुरू असलेल्या कोविड लसीकरण शिबीरात जाऊन कोविड लस घेण्याचे आवाहन करावे, अशी विनंती केली. त्यानंतर मौलवीं रहेमत हाफिज यांनी शेवटी उपस्थित वऱ्हाडी मंडळींना लस घेण्यास आवाहन केले. यावेळी यावेळी मी लवकरच माझ्या पत्नी सोबत कोविड लस घेणार असल्याचे मोहम्मद आमीर यांनी सांगितले.

'सुरुवातीपासून करतोय जनजागृती' -

गुप्ता नगर परिषदेच्या शाळेच्या आवारात कोविड लसीकरणसाठी एक महिण्यापासून शिबीर लावण्यात आले आहे. माझ्या प्रभाग 5 मधील नागरिकांसाठी शिबिराचा ठिकाण अत्यंत जवळ असून मी संपूर्ण प्रभागातील व शहरातील नागरिकांना लस घेण्यासाठी जागृती केली आहे. अनेकांनी या शिबीरात लस घेतली आहे, असल्याचे नगरसेवक अरविंद होंडे यांनी सांगितले.

'मुस्लीम समाजात मोठ्या प्रमाणात लसीकरण' -

मुस्लीम समाजामध्ये लस घेण्यासंदर्भात गैरसमज पसरविण्यात आला होता. त्यामुळे या समाजामध्ये लसीकरणचा प्रमाण कमी होते. मात्र, आम्ही मौलवी, समाजसेवक व प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून लसीकरण बाबतीत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना वस्तुस्थिती समजली आहे. मुस्लीम समाजामध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशी प्रतिक्रिया देत नागरिकांनी लस घ्यावे, अशी विनंती बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांनी केली आहे.

राज्यातून 20 क्रमांकावर आहे, बुलडाणा जिल्हा -

राज्यातील 36 जिल्ह्यात कोविड लसीकरण केल्या जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास 21 लाख कोविड लस देणे अपेक्षित आहे. एक महिण्यापूर्वी बुलडाणा जिल्हा हा राज्यात 33 व्या क्रमांकावर होता. तर सध्या जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्का वाढला आहे. 71 टक्के 15 लाख नागरिकांचा पहिला डोस झाले असून 35 टक्के 7 लाख नागरिकांचा दुसरा डोस झाले आहे. यामुळे लसीकरणात राज्यात सद्या बुलडाणा जिल्हा 20 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.

हेही वाचा -Winter session 2021 : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने होणार?

Last Updated : Dec 4, 2021, 9:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details