महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिमच्या रिसोड शहरातील नागरिकांचं समता फाउंडेशनच्या वतीने लसीकरण

रिसोड शहरातील 18 वर्षांवरील 30 हजार नागरिकांच्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. समता फाउंडेशनने आरोग्य विभाग आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरण सुरू केले आहे. या लसीकरणाचा सर्वाधिक फायदा 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना होणार आहे. शासन वगळता सरसकट सर्व सामान्य 30 हजार नागरिकांचे लसीकरण करणारे समता फाउंडेशन हे महाराष्ट्रात एकमेव आहे.

Samata Foundation
वाशिमच्या रिसोड शहरातील नागरिकांचं समता फाउंडेशनच्या वतीने लसीकरण..

By

Published : Jun 6, 2021, 10:23 AM IST

वाशिम - जिल्ह्याच्या रिसोड शहरातील 18 वर्षांवरील 30 हजार नागरिकांच्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. समता फाउंडेशनने आरोग्य विभाग आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे लसीकरण सुरू केले आहे. या लसीकरणाचा सर्वाधिक फायदा 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना होणार आहे. शासन वगळता सरसकट सर्व सामान्य 30 हजार नागरिकांचे लसीकरण करणारे समता फाउंडेशन हे महाराष्ट्रात एकमेव आहे.

वाशिमच्या रिसोड शहरातील नागरिकांचं समता फाउंडेशनच्या वतीने लसीकरण..

रिसोड शहरातील 18 वर्षांवरील 30 हजार नागरिकांचं समता फाउंडेशनच्या वतीने लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरणासाठी कोविशिल्ड लस उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरणामुळे रिसोड मधील 18 वर्षांवरील अनेक लाभार्थी आनंदित दिसत आहेत. शहरातील 30 हजार नागरिकांचे सरसकट लसीकरण करण्यात येत असून लवकरच सर्वांचं लसीकरण पूर्ण करणार असल्याचं समता फाउंडेशन चे पुरूषोत्तम अग्रवाल यांनी सांगितलं.

समता फाउंडेशनचा हा उपक्रम कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी फार उपयोगी ठरणार असल्याचं आमदार अमित झनक यांनी सांगितलंय. समता फाउंडेशनने कोविशिल्ड लस रिसोड शहरातील 30 हजार नागरिकांना उपलब्ध केली असून त्यांचा उपक्रम स्तुत्य आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details