वाशिम- नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासाठी मंगरुळपीर तालुक्यातील चोरद येथील दोन महिला शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. मात्र, जेवढे भूसंपादन करण्यात आले तेवढा मोबदला यांना मिळालेला नाही. जास्त भूसंपादन होऊनही कमी क्षेत्राचा मोबदला प्राप्त झाल्यामुळे त्यांनी महसूल विभागात तक्रार दाखल केली. मात्र, तरीही न्याय मिळाला नसल्याने त्यांनी २२ एप्रिल पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आता त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.
समृद्धी महामार्गातील भूसंपादनाचा मोबदला द्या; उपोषणकर्त्या महिला शेतकऱ्यांची प्रकृती खालावली
२२ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र अजूनही प्रशासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे उपोषण कर्त्या महिलांची प्रकृती खालावत चालली आहे.
उपोषणकर्त्या महिला
सरुबाई तायडे आणि देवकाबाई आडे अशी त्या पीडित शेतकरी महिलांची नावे आहेत. समृद्धी महामार्गाकरीता जेवढी जमीन संपादित झाली तेवढा मोबदला द्यावा अशी मागणी या दोन्ही महिलांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी २२ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र अजूनही प्रशासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे उपोषण कर्त्या महिलांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.