वाशिम : भरधाव वेगासह ट्रिपल सीट मोटारसायकलवरील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये विनाकारण रिकाम्या फिरणाऱ्यावर पोलिसांनी ऑनलाईन ई चलान सुरू केले. यादरम्यान वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी एका ट्रिपल सीट मोटारसायकलला ई चालान दिले होते. तिचा दंड मात्र चारचाकीला झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीचे वाहन असल्याचे दिसत आहे.
वाशिम: गुन्हा केला दुचाकीने; दंड झाला चारचाकीला - वाशिम पोलीस
वाशिम जिल्ह्यासह (Washim District) अन्य शेजारील जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा चोरीच्या मोटारसायकलवर आपल्या मनाचा नंबर टाकून बिनधास्तपणे गाड्या चालवीत आहेत.
Washim
मोटारयसायकल चोरीचे प्रमाण वाढले
वाशिम जिल्ह्यासह अन्य शेजारील जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा चोरीच्या मोटारसायकलवर आपल्या मनाचा नंबर टाकून बिनधास्तपणे गाड्या चालवीत आहेत. मात्र, शिरपूर येथे घडलेल्या प्रकारामुळे परिवहन विभागाला अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा -Param Bir Waze Meeting : सिंग-वाझे भेटीबाबत चौकशीचे आदेश - गृहमंत्री वळसे