वाशिम - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभर संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कुटुंब घरात बसले आहे. मात्र, कारंजा येथील हिंदू मुस्लिम महिलांनी घरी न बसता संचारबंदीचे काटेकोर पालन करून मानवतेच्या दृष्टीने झटत आहेत. शहरातील गरजू नागरिकांच्या भावनांचा आदर करीत 'ध्यास' या संस्थेच्या माध्यमातून मोफत भोजन व्यवस्था करून दिली आहे. शिवाय संकटकाळात आज हिंदू-मुस्लिम या सामाजिक एक्याचे सुद्धा दर्शन त्यांनी घडविले.
मानवतेसाठी गळल्या जाती धर्माच्या भिंती.. गरजूंना दोन वेळचे जेवण देण्याचा वाशिमच्या महिलांचा 'ध्यास' - WASHIM CORONA UPDATE
कोणी उपाशी राहू नये ही मानवता आहे. शहरातील महिलांची सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत असलेल्या 'ध्यास' (एक न संपणारा प्रवास) या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून खांद्याला-खांदा लावून कार्यरत आहे.
मानवतेसाठी गळल्या जाती धर्माच्या भिंती.. ध्यास संस्थेकडून गरजूंना दोन वेळचे जेवण
ध्यास संस्थेच्या अध्यक्ष पूनम बंग, रोशनी रेवाळे, शबाना अजीम शाह, मेघा पेटकर, शैलजा पेटकर, तृप्ती सावजी, नलिनी विभूते, मीरा पानझाडे आदि महिलासह आशीष गावंडे, संजय चौधरी आदि मंडली सेवा देत आहे.
Last Updated : Apr 19, 2020, 5:49 PM IST