बुलडाणा- जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 होती. त्यात आणखी दोन रुग्णांची भर पडून आकडा 11वर पोहोचला आहे. शेगाव आणि सिंदखेडराजामधील 2 रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
बुलडाण्यात कोरोनाचे दोन रुग्ण वाढले, रुग्णांची संख्या 11 वर.. - washim corona news
जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 9 होती. त्यात आणखी दोन रुग्णांची भर पडून आकडा 11वर पोहोचला आहे.
रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आवाहन आहे. दोन्ही पॉझिटीव्ह रुग्ण दिल्लीहून परतल्याची माहिती आहे. दिल्लीच्या निजमुद्दीन येथील मरकझमधून परत आलेले चिखलीतील 2, देऊळगावराजा आणि खांमगाव येथील एक-एक रुग्ण कोरोना पोझिटीव्ह आढळले होते. यावरून आरोग्य यंत्रणेने यांच्या संपर्कातील आल्याची यादी तयार करून 63 पैकी 27 मधील रुग्णांचे स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यामधील 25 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर उर्वरित दोन रुग्णांचे अहवाल सोमवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.