महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी विभागाच्या कर्मचाऱयांना २ महिन्यांपासून रजाच नाही

वाशिम जिल्ह्यात कृषी विभागासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ते कृषी चिकित्सलयापर्यंत ४५७ पदे मंजूर असताना त्यापैकी केवळ ३१० पदांवर विविध संवर्गातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.

By

Published : Mar 18, 2019, 9:35 AM IST

वाशिम कृषी विभाग

वाशिम - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात रिक्त पदांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱयांसह इतर अधिकारी, कर्मचाऱयांना गेल्या २ महिन्यांपासून रजेविना काम करावे लागत आहे. विविध कामांचा भार वाढल्याने अधिकारी, कर्मचारी स्वेच्छेने कर्तव्यावर रुजू होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वाशिम कृषी विभाग

वाशिम जिल्ह्यात कृषी विभागासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ते कृषी चिकित्सलयापर्यंत ४५७ पदे मंजूर असताना त्यापैकी केवळ ३१० पदांवर विविध संवर्गातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. महत्त्वाच्या कृषी उपसंचालकांसह तालुका कृषी अधिकाऱयांपासून शिपायापर्यंतची तब्बल १४७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या योजना राबविण्यात प्रचंड अडचणी येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details