महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनाबट पोलिसांनी पकडली बनावट दारू, चोरावर मोर ठरले पोलीस - तोतया पोलिस

जिल्ह्यातील शेलुबाजार येथे दारू विक्रेत्यांना पैशाची मागणी करणाऱ्या दोन तोतया पोलिसांना मंगरूळपीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस

By

Published : Sep 11, 2019, 11:24 AM IST

वाशिम- जिल्ह्यातील शेलुबाजार येथे दारू विक्रेत्यांना पैशाची मागणी करणाऱ्या दोन तोतया पोलिसांना मंगरूळपीर पोलिसांनी ताब्यात घेतले . विष्णू चव्हाण ( वय ३९ वर्षे, रा. पिंपळगाव, ता. पुसद), मंगल चव्हाण (वय ४० वर्षे, धानोरा, ता. मानोरा), अशी आरोपींची नावे आहेत .

शेलुबाजार येथील दारू विक्रेत्याकडे विष्णू चव्हाण व मंगल चव्हाण या दोघांनी आम्ही पोलीस असून, तुम्ही बनावट दारू विकता असे म्हणत पैशांची मागणी केली. परंतु, हे दोघे बनावट पोलीस असल्याचे लक्षात येताच यासंदर्भात मंगरुळपीर पोलिसांना माहिती देण्यात आली. या तोतया पोलिसांनी मंगरुळपीर पोलिसांशी देखील अरेरावी केली. यावेळी तोतया पोलिसांना ताब्यात घेतले असता, ते दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त केले. अधिक चौकशी केली असता या दोघांविरुद्ध राज्यात विविध ठिकाणी अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details