वाशिम- जिल्ह्यातील शिरपूर-आसेगाव रस्त्यावरील वाघीच्या समोरील नाल्यामध्ये ४ लहान मुले वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गावकऱ्यांनी या ४ मुलांना शोधण्याचे कार्य सुरु केले होते. यात गावकऱ्यांना २ मुलांना वाचविण्यात यश आले आहे.
नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या चार मुलांपैकी दोघांना वाचविण्यात यश; दोघे अजूनही बेपत्ता - पूजा बाळू पवार
जिल्ह्यातील शिरपूर-आसेगाव रोडवरील वाघीच्या समोरील नाल्यामध्ये 4 लहान मुले वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. गावकऱ्यांनी या चारही मुलांना शोधण्याचे कार्य सुरु केले होते. या शोधमोहिमेत गावकऱ्यांना २ मुलांना वाचविण्यात यश आले आहे.
वाघी बुद्रुक येथील नाल्याला पूर आला होता. हा नाला पुरामुळे ओसंडून वाहत होता. दरम्यान, या नाल्याजवळ आलेली ४ मुले त्यातील नाल्याच्या पाण्यात वाहून गेली होती. ओमकार राधेश्याम पवार, शुभम अनिल पवार, पूजा बाळू पवार (वय १४), तर तिचा भाऊ पारस बाळू पवार (वय ७) असे नाल्यात वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. यांच्यापैकी पूजा बाळू पवार व पारस बाळू पवार हे सख्खे भाऊ-बहीण आहेत. गावकऱ्यांना ओमकार राधेश्याम पवार व शुभम अनिल पवार या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र, पूजा व तिचा भाऊ पारस बाळू पवार यांचा अद्याप शोध सुरू आहे.