महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या संकटात कलिंगडाची शेती ठरली फायद्याची; दोन एकरात 6 लाखांचे उत्पन्न - washim farmer news

राज्यात कोरोना व्हायरसमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत दोन एकरात कलिंगडाची (टरबूज) लागवड केली आहे. कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागल्याने बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. मात्र राजू चौधरी यांनी स्वतःच कलिंगडाची विक्री करून सहा लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.

washim farmer news
कोरोनाच्या संकटात कलिंगडाची शेती ठरली फायद्याची; दोन एकरात 6 लाखांचे उत्पन्न

By

Published : May 9, 2021, 2:13 PM IST

Updated : May 9, 2021, 2:30 PM IST

वाशिम -राज्यात कोरोना व्हायरसमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील जलालपूर येथील राजू चौधरी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत दोन एकरात कलिंगडाची (टरबूज) लागवड केली आहे. त्यांना यापासून एकरी 30 टन उत्पन्न अपेक्षित असून, लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःच बैलगाडीमधून 10 रुपये किलो विक्री करीत असल्याने त्यांना सहा लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. लागवड खर्च वगळता त्यांना पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळवला.

प्रतिक्रिया

कामरगाव येथील राजू चौधरी यांनी दोन महिन्यांपूर्वी दोन एकरात कलिंगडाची लागवड केली. मात्र कलिंगड विक्रीला आले असता पुन्हा राज्यात लॉकडाऊन लागल्यामुळे विक्री कुठे करावी असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र चौधरी यांनी थेट ग्राहक ते शेतकरी यापद्धतीने विक्री सुरू केली. याला चांगला प्रतिसाद मिळाला. व 10 ते 15 रुपये प्रतिकिलो भाव मिळून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.

पिकविलेला शेतमाल स्वतः विकल्यास फायदा -

कोरोना संसर्गामुळे कडक निर्बंध लागल्याने बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. मात्र राजू चौधरी यांनी स्वतःच कलिंगडाची विक्री केल्यामुळे त्यांना चांगला नफा मिळाला आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी ही यांच्याप्रमाणे पिकविलेला शेतमाल स्वतः विक्री केल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही. यात मात्र शंका नाही.

हेही वाचा - नवी मुंबईतील मेट्रोचा मुहूर्त ठरला; मेट्रोची चाचणी यशस्वी

Last Updated : May 9, 2021, 2:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details