वाशिम - जिल्ह्यातील आणखी २० व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १५, मंगरूळपीर शहरातील ३, मालेगाव येथील १ व रिसोड तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 154वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाला तर 68 रुग्ण उपचार घेत आहेत
वाशिममध्ये २० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णांची संख्या 154वर
मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील ३६ वर्षीय व्यक्ती, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी परिसरातील २५ वर्षीय महिला, बिलाला नगर परिसरातील ४५ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरुष, आंचळ (ता. रिसोड) येथील ४४ महिलेला सुद्धा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाशिम शहरातील माधवनगर परिसरातील एकाच कुटुंबातील ३४ वर्षीय पुरुष व २७ वर्षीय महिला, ध्रुव चौक परिसरातील ३५ वर्षीय पुरुष, कसाबपुरा परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, हकीमअली नगर परिसरातील ३८ वर्षीय व्यक्ती, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील एकाच कुटुंबातील ४९ वर्षीय पुरुष व ४२ वर्षीय महिला, तोरणाळा (ता. वाशिम) येथील २९ वर्षीय पुरुषाचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच वाशिम शहरातील गंगू प्लॉट परिसरातील ४० व ३४ वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगी, १६ व १७ वर्षीय युवक, ३० वर्षीय पुरुष, बिलाला नगर येथील १२ वर्षीय मुलगा कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.