महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिमध्ये कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक पलटी; चालक व क्लीनर गंभीर जखमी - वाशिम बातमी

मंगरुळपीर मानोराकडे कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक ( एम एच 05 बि डी.0094) आज सकाळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पलटी झाला. या अपघातात ट्रक वरील कोंबड्यांची वाहतूक करणारी कॅबीन ट्रकच्या मुख्य कॅबीनवर आदळल्याने चालक व क्लीनर दोघे जखमी झाले.

कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक पलटी

By

Published : Aug 31, 2019, 5:58 PM IST

वाशिम - येथील मंगरुळपीर-मानोरा मार्गावर आमगव्हान जवळ कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. यात चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत. तर शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.

कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक पलटी
मंगरुळपीर मानोराकडे कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक ( एम एच 05 बि डी.0094) आज सकाळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पलटी झाला. या अपघातात ट्रक वरील कोंबड्यांची वाहतूक करणारी कॅबीन ट्रकच्या मुख्य कॅबीनवर आदळल्याने चालक व क्लीनर दोघे जखमी झाले. तर त्यांना कॅबीनमधून काढण्याकरीता जेसीबीची मदत घेण्यात आली.

हेही वाचा-वाशिममध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडूच्या ११०० गणेशमूर्ती

जखमींना तातडीने मानोरा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर यामध्ये अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. या अपघातात अंदाजे लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. तर घटनास्थळी मानोरा पोलिसांची कार्यवाही अद्याप सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details