महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कापसाच्या ट्रक उलटून लागली आग, १० लाखांचे नुकसान - अपघात

कापसाने भरलेला ट्रक परभणीहून अमरावतीकडे जात होता. समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक उलटला आणि विजेच्या खांबावर आदळला.

अपघातग्रस्त ट्रक

By

Published : Apr 5, 2019, 10:15 AM IST

Updated : Apr 5, 2019, 10:25 AM IST

वाशिम - चालकाचे नियंत्रण सुटून कापसाने भरलेला ट्रक उलटला. यामुळे ट्रकला आग लागल्याने कापसासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजीक घडली.

अपघात झालेला ट्रक

कापसाने भरलेला ट्रक परभणीहून अमरावतीकडे जात होता. कारंजा-अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजीक सुरू असलेल्या पुलाच्या कामाजवळील वळणमार्गावर होता. समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक उलटला आणि विजेच्या खांबावर आदळला. त्यावेळी विजेच्या खांबावरील जीवंत तारांचे घर्षन होऊन पडलेल्या ठिणगीने ट्रकमधील कापसाने पेट घेतला. यात कापसासह ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला.

या घटनेत जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कामरगाव चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारंजा येथील अग्निशमनदलाच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले.

Last Updated : Apr 5, 2019, 10:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details