महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण व सीडबॉलचे  प्रशिक्षण, 'मी वाशिमकर' ग्रुपचा उपक्रम - greencity washim

पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शहरातील  मी वाशिमकर ग्रुपने शालेय विद्यार्थ्यांसाठी  वृक्षारोपण व सीडबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांना वृक्षरोपण व सीडबॉलचा  प्रशिक्षण

By

Published : Aug 2, 2019, 11:59 AM IST

वाशिम-वाढत्या तापमानामुळे (ग्लोबल वॉर्मिंग) पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम होतील. यामुळेच पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शहरातील मी वाशिमकर ग्रुपने शालेय विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण व सीडबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. वाशिमच्या विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कुल, येथे हा प्रशिक्षण वर्ग पार पडला. या प्रशिक्षण वर्गात ३०० विद्यार्थ्यांनी मिळुन ९०० सीडबॉल बनविले.

विद्यार्थ्यांना वृक्षरोपण व सीडबॉलचा प्रशिक्षण

पर्यावरण जनजागृती साठी वाशिम शहरात मी वाशिमकर ग्रूपच्यावतीने वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना सीडबॉल बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गात एकूण ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना मातीच्या गोळ्यापासून सिडबॉल तयार केले. या प्रशिक्षण वर्गातून जवळपास ९०० सीड बॉल तयार करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गामुळे भविष्यात शहराची ओळख ग्रीनसिटी अशी होईल, असा आशावाद आहे. उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी वाशिमकर ग्रुप व शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details