महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रवाशांना बसमध्ये चक्क छत्री उघडून करावा लागला प्रवास; वाशिम जिल्ह्यातील प्रकार - चक्क छत्री उघडून प्रवास

बसच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करावा लागला. अकोला-दिग्रस बसमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

प्रवाशांना चक्क छत्री उघडून करावा लागला प्रवास

By

Published : Aug 1, 2019, 10:44 AM IST

वाशिम- अकोला येथून मानोराकडे जात असलेल्या बसच्या छताला गळती लागल्याने प्रवाशांना चक्क छत्री उघडून प्रवास करावा लागला. अकोला-दिग्रस बसमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

प्रवाशांना चक्क छत्री उघडून करावा लागला प्रवास

अकोला येथून एसटी बस (एम एच 20 एन 8286) दिग्रसला जाण्यासाठी निघाली. वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील काही प्रवासी या बसमध्ये बसले. दरम्यान, अचानक पाऊस सुरू झाला. मात्र, बसच्या छताला गळती असल्याने त्यामधून पाणी गळू लागले. त्यामुळे बसमधील प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांनी चक्क छत्री उघडून प्रवास केला.

ABOUT THE AUTHOR

...view details