वाशिम - जिल्ह्यातील कामरगाव येथील सुधाकर पुंड यांनी दोन एकरावर टोमॅटोची लागवड केली. ऐन टोमॅटो विक्रीला आले असता, कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने जिल्हाबंदी झाली. त्यामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने दोन एकर क्षेत्रातील टोमॅटो शेतात सडत आहेत. त्यांना एकरी 60 हजार रुपये म्हणजे दोन एकरात सव्वा लाख रुपये खर्च आला असून लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
दोन एकरातील टोमॅटोचा कोरोनामुळे रेंधा; शेतकरी संकटात - washim crop latest news
लाखो रुपयांचे नुकसान त्यात भविष्यातील मशागतीची चिंता सुधाकर पुंड यांच्यासमोर उभी आहे. डोळ्यांसमोर पसरलेला लाल चिखल दूर करण्यासाठी जड मनाने सुधाकर पुंड कामाला लागले आहेत.
दोन एकरातील टोमॅटोचा कोरोनामुळे रेंधा; शेतकरी संकटात
दोन एकरातील टोमॅटो सडत चालला आहे. टोमॅटोची झाडे काढून टाकण्यासाठी व पुन्हा मशागत करण्यासाठी खर्च लागणार आहे. लाखो रुपयांचे नुकसान त्यात भविष्यातील मशागतीची चिंता सुधाकर पुंड यांच्यासमोर उभी आहे. डोळ्यांसमोर पसरलेला लाल चिखल दूर करण्यासाठी जड मनाने सुधाकर पुंड कामाला लागले आहेत. आत पुढे काय करावं? हा प्रश्नदेखील त्यांना छळत आहे.