महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम - जऊळका गावात वादानंतर पोलिसांचा कडक बंदोबस्त; गावाला आले छावणीचे स्वरूप - washim live news

मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे काल दोन गटात वाद झाला. हा सोडविण्यासाठी जऊळका पोलीस गेले असता तेथील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने वाशिम पोलिसांनी गावात अतिरिक्त पोलिसांची तुकडी बोलावली असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Tight security in the village after the dispute in Washim
वाशिम येथे वादानंतर गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By

Published : May 28, 2021, 11:54 AM IST

वाशिम -जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे दोन गटात प्रचंड हाणामारी झाली होती. यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याने पोलीस ही जखमी झाले. त्यानंतर काल दिवसभर पोलिसांनी आरोपीची धरपकड सुरू केली होती. आतापर्यंत १८ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील तीन आरोपींना पकडले असून १५ आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान जऊळका गावात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असल्याने छावणीच स्वरूप आले आहे.

वाशिम येथे वादानंतर गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

१८ आरोपींवर गुन्हे दाखल -

मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे दोन गटात वाद झाला. हा सोडविण्यासाठी जऊळका पोलीस गेले असता तेथील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने वाशिम पोलिसांनी गावात अतिरिक्त पोलिसांची तुकडी बोलावली असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटातील १८ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, अद्याप १५ फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती जऊळका पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी दिली आहे.

हेही वाचा - जऊळका रेल्वे येथे दोन गटात वाद; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवरही हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details