महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, तर दोन जण अत्यवस्थ - accidents in washim

कारंजा तालुक्यातील बुद्रुक ते भिवरी रस्त्यादरम्यान दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

accidents in washim
दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, तर दोन जण अत्यवस्थ

By

Published : Aug 20, 2020, 8:30 AM IST

वाशिम - कारंजा तालुक्यातील बुद्रुक ते भिवरी रस्त्यादरम्यान दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

कारंजा तालुक्यातील बुद्रुक ते भिवरी रस्त्यादरम्यान दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला आहे.

कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक ते भिवरी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात सुभाष टाके (वय-62) आणि प्रताप मोहिते (वय-30) या दोघांचा मृत्यू झाला असून अभिजित टाके गंभीर जखमी झाला आहे.

दुचाकीची बैलाला धडक

तर दुसरा अपघात लाडेगाव ते कामरगाव रस्त्यावर घडला असून दुचाकीने बैलाला दिलेल्या धडकेत प्रांजल गजभिये (वय -27) यांचा जागीच मृत्यू झालाय. अमोल सवई (वय-36) हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details