वाशिम- जिल्ह्यात आज रविवारी ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीली सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकाही घेण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मतदानाप्रसंगी मतदारांच्या डाव्या हाताच्या बोटाऐवजी उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.
निशाणी उजवं बोट : वाशिम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला सुरुवात - grampanchayat
जिल्ह्यात आज रविवारी ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीली सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकाही घेण्यात येत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील एकांचा,अडगाव खु,देवठाणा बु,जांभरुण नावजी,वांगी,सोयता,रिसोड तालुक्यातील भरजहागीर,मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे,खडकी इजारा,कुत्तरडोह,मुसळवाडी,अमाना,मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा,लाठी,चिखली,तपोवन,बिटोडा,इचोरी,मानोरा तालुक्यातील बोरव्हा,चौसाळा,दापुरा बु. दापुरा खु,ढोणी,फुलउमरी,गिरोली,जामदरा घोटी,काली,कोलार,पाळोदी,सोमेश्वरनगर,उमरी बु,उमरी खु या ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
याबरोबरच जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठीही मतदान होत आहे.