महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा 30 टक्के पगार त्यांच्या पालकांच्या खात्यात होणार जमा - washim district news

वाशिम जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी त्यांच्या आई-वडीलांचा सांभाळ करणार नाहीत, त्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील 30 टक्के रक्कम त्यांच्या आई-वडीलांच्या बँक खात्यात जमार होर आहे.

वाशिम जिल्हा परिषद
वाशिम जिल्हा परिषद

By

Published : Feb 2, 2021, 3:11 PM IST

Updated : Feb 2, 2021, 4:10 PM IST

वाशिम - जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आई-वडीलांना सांभाळावेच लागणार आहे. वाशिम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी मांडलेल्या ठरावानुसार जिल्हा परिषदेतील जे कर्मचारी त्यांच्या आई-वडीलांचा सांभाळ करणार नाहीत, त्या कर्मचाऱ्यांचा 30 टक्के पगार त्यांच्या आई-वडीलांच्या खात्यात जमा होणार आहे. हा ठराव सर्वानुमते पारित झाला आहे.

वृद्ध आई-वडीलांचा सांभाळ समाजात चिंतेचा विषय

समाजात वृद्ध आई-वडीलांचा सांभाळ हा चिंतेचा विषय बनला आहे. सभापती या नात्याने तालुक्यातील विविध गावांच्या दौऱ्यावेळी हे लक्षात आल्याचे सभापती रेश्मा गायकवाड यांनी सांगितले. यासाठी आई-वडीलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पगारातील 30 टक्के रक्कम त्यांच्या आई-वडिलांच्या बँक खात्यात जमा करण्याचा ठराव मांडला होता. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा -वाशिम: दुकानातून सुपारी घेणे दामपत्याला पडले महागात

Last Updated : Feb 2, 2021, 4:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details