वाशीम : महावितरणने शेतकऱ्यांचा तोडलेला वीज पुरवठा तातडीने जोडून द्यावा, अन्यथा ऊर्जा मंत्र्यांच्या घरासह महावितरण कार्यालयाचाच वीज पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोलेंनी महावितरणला दिला आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा महावितरणने तोडू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.
...तर ऊर्जा मंत्र्यांच्या घरासह महावितरण कार्यालयाचीच वीज तोडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा - damuanna ingole
कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा महावितरणने तोडू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तर महावितरणचीच वीज तोडू
कृषी पंपाच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे. तर काही ठिकाणी डीपीच बंद केल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी पिकला पाणी द्यायचे तरी कसे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा तोडू नये अशी मागणी इंगोले यांनी केली आहे. इंगोले यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंतांना निवेदन देत वीज जोडणीसाठी तीन दिवसांचा अलटीमेटम दिला आहे. तीन दिवसांत वाशीम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्टाईलने वीज वितरण कार्यालयाचीच वीज तोडू असे त्यांनी म्हटले आहे.