महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसस्टेशनच्या आवारात दुचाकी पार्क करून केली चोरी - वाशिम दुचाकी लावून चोरी

जिल्ह्यातील मालेगावमधील एका मोबाईल दुकानाची भिंत फोडून दोन लाख रुपयांच्या मोबाईल चोरीची घटना समोर आली आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये चोरट्याने दुचाकी लावून चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलिसस्टेशनच्या आवारात दुचाकी पार्क करून केली चोरी
पोलिसस्टेशनच्या आवारात दुचाकी पार्क करून केली चोरी

By

Published : Jan 19, 2021, 2:19 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील मालेगावमधील एका मोबाईल दुकानाची भिंत फोडून दोन लाख रुपयांच्या मोबाईल चोरीची घटना समोर आली आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये चोरट्याने दुचाकी लावून चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र चोरट्यांनी आपले वाहन पोलीस स्टेशन परिसरातही दुकान फोडल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसस्टेशनच्या आवारात दुचाकी पार्क करून केली चोरी
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर शहरातील जुना बस स्थानकाजवळ असलेल्या न्यू वॉच आणि मोबाईल शॉपीमध्ये भिंत फोडून रात्री चोरी झाल्याची घटना घडली आहे. एक लाख 97 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दरम्यान ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. दुकानात यंत्रणा लावली असून सुद्धा पोलीस या घटनेबाबत अनभिज्ञ आहे. मात्र गेल्या काही दिवसांत मालेगावात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details