वाशिम -जिल्ह्यातील मंगरूळपीरच्या दर्गा चौकात आज (बुधवार) सकाळी पावसामुळे दोन मजली इमारत कोसळली. मंगरूळपीरमध्ये गेल्या 12 तासांपासून सतत पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे मंगरूळपीर शहरातील मुख्य दर्गाह चौक मार्केटच्या रस्त्यावर असलेली जुनी दोन मजली इमारत कोसळली आहे.
पावसामुळे दोन मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही - वाशिम पाऊस
मंगरूळपीरच्या दर्गा चौकात आज (बुधवार) सकाळी पावसामुळे दोन मजली इमारत कोसळली. मंगरूळपीरमध्ये गेल्या 12 तासांपासून सतत पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे मंगरूळपीर शहरातील मुख्य दर्गाह चौक मार्केटच्या रस्त्यावर असलेली जुनी दोन मजली इमारत कोसळली आहे.
इमारत कोसळल्याने याठिकाणी नागरिकांची पळापळ झाली. रॉयल हॉटेल या इमारतीच्या जवळ आहे. मात्र आज बकरी ईदमुळे हॉटेलमध्ये कोणी नव्हते. यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी दहाच्या सुमारास अचानक ही इमारत कोसळल्यामुळे धुळीचे ढग वाढले होते. त्यामुळे काही काळ रस्त्यावर काही दिसत नव्हते. यावेळी आजूबाजूच्या दुकानांमध्ये आरडाओरड झाली. दुकानांसमोर उभे असलेले लोक पळून गेले. घटनेच्या वेळी हॉटेल आणि रस्ता रिक्त होता. अन्यथा त्या रस्त्यावर गर्दी असल्याने मोठा अपघात झाला असता.