वाशिम - विघ्नहर्त्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांची लगबग सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील सावरगाव बरडे या गावाची ओळख 'देव साकारणार गाव' म्हणून आहे. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी सरकारने निर्बंध लादल्यामुळे वाशिम जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मागणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती बनविणाऱ्यांवर मोठे विघ्न आले आहे.
सावरगावात गणेश मूर्ती बनिवण्याचे काम वर्षभर सुरू असते. मात्र, जून महिन्यापासून या कामाला खरा वेग येतो. सार्वजनिनक गणेश मंडळाबरोबरच घरगुती मूर्तींचीही मोठी मागणी असते. मात्र, कोरोनाच्या पाश्वशूमीवर सरकारने मागील वर्षी गणेश उत्सावावर निर्बंध लादले होते. यंदा सर्व सुरळीत होईल, या आशेने मूर्तीकारांनी गणेश मूर्ती तयार केल्या. मात्र, सरकारने यंदाही निर्बंध घातल्यामुळे सावरगावतील मूर्तींसाठीची मागणी घटली आहे. याचा परिणाम मूर्तीकारांवर झाला आहे. यामुळे येथील मूर्तीकारांवर मोठे आर्थीक संकट आले आहे.
या जिल्ह्यातून होत होती मागणी