महाराष्ट्र

maharashtra

वाशीम जिल्हा परिषदेत कोरोनाबाधितांचा आकडा 15 वर

By

Published : Mar 15, 2021, 10:27 AM IST

ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त नागरिकांची वर्दळ असते. कोरोना काळातही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती वर्तविण्यात येत होती. ही भीती खरी ठरली आहे.

वाशीम जिल्हा परिषदेत कोरोनाबाधितांचा आकडा 15 वर
वाशीम जिल्हा परिषदेत कोरोनाबाधितांचा आकडा 15 वर

वाशीम : वाशीम जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शासकीय कार्यालयातही आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. वाशीम जिल्हा परिषद कार्यालयात गेल्या काही दिवसांत एकूण 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अनेक विभागांत कोरोनाचा शिरकाव
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त नागरिकांची वर्दळ असते. कोरोना काळातही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती वर्तविण्यात येत होती. ही भीती खरी ठरली आहे. जिल्हा परिषदेतील 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा परीषद कार्यालयातील चार ते पाच विभागांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच विभागांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद कार्यालयात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनाचा वाढता प्रसार बघता नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

हेही वाचा -नागपुरात संचारबंदीपूर्वी 2252 कोरोनाग्रस्तांची भर, आजपासून संचारबंदीला सुरूवात

ABOUT THE AUTHOR

...view details