वाशिम - रिसोड तालुक्यातील वनोजा गावातील एका शेतकऱ्याचा विहीरत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रवी भुजंगराव देशमुख असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; वनोजा गावातील घटना
रवी भुजंगराव देशमुख असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
रवी देशमुख यांच्या शेतातील विहीर
वनोजा येथील तरुण शेतकरी रवी भुजंगराव देशमुख यांनी आपल्या शेतात डाळिंब लावली आहेत. त्या डाळिंबाच्या बागेला पाणी देण्यासाठी ते गेले होते. काही कामानिमित्त ते विहिरीजवळ गेले तेव्हा त्यांचा पाय घसरला अन् ते विहिरीत पडले. यामध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाला.