महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम; कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई; १ कोटी ७७ लाखांचा दंड वसूल

नागरिकांना वेळोवेळी सूचना करूनही शहरात विनामास्क फिरताना आढळून आलेल्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई सुरू केली आहे. तसेच विनापरवाना गाडी चालवीत असताना आढळून अलेल्या नागरिकांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

वाशिम कोरोना
washim corona

By

Published : Mar 17, 2021, 1:51 PM IST

वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार मास्क वापरने बंधनकारक आहे. मात्र, वाशिम जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या 37 हजार 582 नागरिकांवर कारवाया केल्या आहेत. विनापरवाना गाडी चालविणाऱ्या नागरिकांवर वाशिम पोलिसांनी धडक कारवाई करत वर्षभरात तब्बल 1 कोटी 77 लाख 95 हजारांचा दंड वसूल केला आहे.


मास्क बंधनकारक
त्यातच वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना संसर्ग वाढत असल्याने मास्क न लावणाऱ्यावर वाहनचालकांसह नागरिकांवर 18 फेब्रवारी 2021 ते 15 मार्च दरम्यान 6516 नागरिकांनकडून 32 लाख 58 हजार रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. नागरिकांना वेळोवेळी सूचना करूनही शहरात विनामास्क फिरताना आढळून आलेल्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई सुरू केली आहे. तसेच विनापरवाना गाडी चालवीत असताना आढळून अलेल्या नागरिकांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार चेहऱ्यावर मास्क लावूनच बाहेर पडावे, असे आवाहन पोलीस प्रशासन करत आहे.

हेही वाचा-स्कॉर्पिओ, इनोव्हा, मर्सडीज 'या' ३ कारमध्ये दडलेय वाझे प्रकरणाचे गुढ

ABOUT THE AUTHOR

...view details