महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तापमानवाढीने वाशिम जिल्ह्यातील नागरिक हैराण - वाशिममध्ये तापमान वाढ

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दिवसा उन्हाचा पारा 44 अंशावर जात आहे तर लॉकडाऊनमुळे नागिरकांना सायंकाळी घराबाहेर पडता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

वाशिम तापमान वाढ
वाशिम तापमान वाढ

By

Published : May 26, 2020, 5:54 PM IST

वाशिम - एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दिवसा उन्हाचा पारा 44 अंशावर जात आहे तर लॉकडाऊनमुळे नागिरकांना सायंकाळी घराबाहेर पडता येत नाही. वाढत जाणाऱ्या तापमानामुळे नागरिक आणखी वैतागले असून रात्रीदेखील उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

वाशिम जिल्ह्यात 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. दरम्यान, 44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जिल्ह्यात आजपर्यंत कधीही वाढलेले नव्हते. त्यामुळे रस्त्यावर माणसांचा शुकशुकाट दिसत असून उन्हापासून बचावासाठी रुमाल खरेदी वाढल्याचे दिसून येत आहे.

सध्या राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे पारा वाढण्याची शक्यता असून विदर्भात पारा ४५ डिग्री सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. कमाल तापमाना बरोबरच किमान तापमानात वाढ होत असल्याने रात्रीही उकाडा वाढू लागला आहे. येते काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details