महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये शाळा बंद; अनुदानासाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन - वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळा बंद करून धरणे आंदोलन

विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळा बंद करून धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने वेळीच दखल घेऊन मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन

By

Published : Aug 16, 2019, 10:32 PM IST

वाशिम - विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळा बंद करून धरणे आंदोलन करण्यात आले. विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

उच्च माध्यमिक घोषित आणि अघोषित शाळांना अनुदानाचा शासनाचा निर्णय काढून शिक्षकांना पगार सुरू करण्यात यावा या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज एक दिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात आले. विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन केले. शासनाने वेळीच दखल घेऊन मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details