वाशिम - शिक्षक नीलेश वाझुळकरांच्या घरी जाऊन पत्नीच्या माहेरच्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाझुळकर यांच्या पत्नीसह इतर 9 जणांविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाझुळकर यांच्या पत्नीसोबत आलेल्या इतर मंडळींच्या गाडीची गावातील काही लोकांनी तोडफोड केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेलगाव बोंदाडे येथे शिक्षक जावयाला घरात घुसून मारहाण - वाशिम पोलीस बातमी
वाझुळकर यांच्या पत्नीसह इतर 9 जणांविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी सहाच्या सुमारास शिक्षक नीलेश वाझुळकर सासरवाडीहून चारचाकी आणि दुचाकी वाहणे घेऊन पत्नी दीपाली, सासरा विश्वंभर खराटे यांच्यासह ऋषिकेश खराटे, ज्ञानबा खराटे, गजानन खराटे, सु. भा. इंगळे व इतर तीन जण शेलगाव बोंदाडे येथे आले. नीलेश वाझुळकर यांना त्यांच्या घरासमोर ऋषिकेश खराटेने काठीने मारहाण केली असून गजानन खराटे हे कुऱ्हाड घेऊन अंगावर गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आई-वडिलांनाही मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले.
नीलेश वाझुळकर यांच्या तक्रारीवरून दीपाली वाझुळकर, विश्वंभर खराटे, ऋषिकेश खराटेने, गजानन खराटे, ज्ञानबा खराटे, सु. भा. इंगळे आणि इतर तिघांविरूद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.