वाशिम- जिल्ह्यातील डोंगरकिन्ही येथील तलाठी बी. सी राठीने मालेगाव तहसील कार्यालय परिसरात शेतकऱ्यांसह पत्रकाराला घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तलाठ्याची शेतकऱ्यासह पत्रकाराला शिवीगाळ; 'स्वाभिमानी'चे कारवाईसाठी ठिय्या आंदोलन - स्वाभिमानी संघटना
डोंगरकिन्ही येथील तलाठी बी. सी राठीने मालेगाव तहसील कार्यालय परिसरात शेतकऱ्यांसह पत्रकाराला घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्याची घटना समोर आली आहे.
डोंगरकिन्ही येथे कार्यरत असलेला तलाठी शेतकऱ्यांशी आणि पत्रकाराशी शिवराळ भाषेत बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. २ दिवसात तलाठ्यावर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करणार इशाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिला आहे.
व्हायरल व्हिडिओ संदर्भात तहसीलदार रवी काळे म्हणाले, की व्हिडिओ माझ्या जवळ आला आहे. अशा असभ्य भाषेचा वापर करणे असभ्य आहे. याप्रकरणी नियमानुसार वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतर तलाठ्यावर कारवाई केली जाणार आहे.