वाशिम - शेतकरी महिलेसह पत्रकाराला तलाठ्याने शिव्या दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मालेगावच्या तहसीलदार कार्यालयात आंदोलन केले होते. याप्रकरणी डोंगरकिन्ही येथील बी. सी. राठी या तलाठ्याला तहसीलदार रवी काळे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
'स्वाभिमानी'च्या आंदोलनाची दखल; 'त्या' तलाठ्याला तहसीलदारांनी बजावली कारणे दाखवा नोटीस
डोंगरकिन्ही येथील तलाठ्याने महिलेसह पत्रकाराला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.
तहसीलदारांना निवेदन देताना स्वाभिमानीचे पदाधिकारी
तहसीलदार काळे यांनी चौकशी करून दोन दिवसात वरिष्ठांकडे अहवाल सादर करुन कारवाईचे आश्वासन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांना दिले आहे. मात्र, दोन दिवसात त्या तलाठ्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही, तर स्वाभिमानी स्टाईलने त्या तलाठ्याचा समाचार घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष इंगोले यांनी सांगितले.