वाशिम - केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, दुधाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर १० रुपये अनुदान वर्ग करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.
कुत्र्याला दुधाने अंघोळ, दूध रस्त्यावर फेकून 'स्वाभिमानी'चे आंदोलन - कुत्र्याला दुधाने अंघोळ
दूध आंदोलनाने राज्यव्यापी स्वरुप धारण केले असून वाशिम जिल्ह्यातही या आंदोलनाचा प्रभाव पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी दूध फेकून दिले तर एका ठिकाणी चक्क कुत्र्याला दूधाने अंघोळ घालण्याचा प्रकार पाहायला मिळाला.

शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामू इंगोले याच्या नेतृत्वात वाशिम इथल्या शासकीय दूध शितकरण केंद्राच्या गेट वर दूध फेकून आंदोलन करत बेसरमीच्या फुलांचा हार घालून मोजक्या कार्यकर्त्यांनी नियमाचे पालन करत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध केला आहे. यासोबतच मालेगाव तालुक्यातील पांघरी नवघरे इथं कुत्र्याला दुधाने अंघोळ घालत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोनल केलंय. यावेळी दुधाचे भाव वाढविण्याची मागणी ही पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात आज दुधाचे मागणीसंदर्भात आंदोलन करण्यात आले. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव व रिसोड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हे आंदोलन करण्यात आले.