महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस भरती सुरू करण्यासाठी वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा, स्वाभिमानी संघटनेने केले नेतृत्व

पोलीस भरतीसाठी स्वाभिमानीच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी एल्गार मोर्चा काढला. सरकारकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनास, व्यवसाय सुरू करण्यास, परवानगी देण्यात येत आहे. मात्र शासनाकडून नोकरभरतीचा निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. त्यामुळे सरकारने पोलीस आणि आर्मी भरती लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी केली आहे.

वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा
वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा

By

Published : Sep 9, 2021, 6:53 AM IST

वाशिम- कोरोनाचे कारण देत पोलीस सरकारकडून नोकर भरती पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे युवा वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विविध शासकीय नोकर भरत्या तात्काळ सुरू करण्याची मागणी करत बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हजारो विद्यार्थ्यांनी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.

वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा, स्वाभिमानी संघटनेने केले नेतृत्व

कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कोरानाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेल राज्यात लॉकडाऊन करावा लागला, त्याच बरोबर नागरिकांसाठी काही निर्बंध लावावे लागले. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सरकारकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनास, व्यवसाय सुरू करण्यास, परवानगी देण्यात येत आहे. मात्र शासनाकडून नोकरभरतीचा निर्णय अद्याप घेण्यात आला नाही. त्यामुळे सरकारने पोलीस आणि आर्मी भरती लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी केली आहे. या एल्गार मोर्चात हजारो विध्यार्थ्यांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा
या मोर्च्याची सुरुवात शहरातील क्रीडा संकुल येथून झाली. त्यानंतर सिव्हिल लाईन वरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयवर धडकला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्ह्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यामध्ये तत्काळ नोकर भरती सुरू करणे, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक फी या संदर्भातील मागण्या सरकारकडे करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details