वाशिम - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम तालुक्यातील सुपखेला ग्रामपंचायतचे सरपंच विनोद पट्टेबहादूर यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून गावात निर्जंतुकीकरण कक्ष ( सॅनिटायझर झोन) बसवले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी सरसावले सुपखेला गाव, लोकसहभागातून 'सॅनिटायझर झोन' - corona virus news
वाशिम तालुक्यातील सुपखेला ग्रामपंचायतचे सरपंच विनोद पट्टेबहादूर यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून गावात निर्जंतुकीकरण कक्ष ( सॅनिटायझर झोन) बसवले आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी सरसावले सुपखेला गाव
त्यामुळे गावातील प्रत्येक नागरिक गावातून बाहेर जाताना आणि गावात परत येताना या कक्षामधून जात आहेत. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे, लोकसहभागातून सॅनिटायझर झोन बनवणारी जिल्ह्यातील सुपखेला ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.