वाशिम -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होत असल्याने राज्यातील बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल विकणे कठीण झाले आहे. मात्र, मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी आजपासून बाजार समिती शेतकऱ्यांसाठी खुली केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे.
मंगरुळपीर बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा यशस्वी प्रयोग - Mangarulpir Lockdown
मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी आजपासून बाजार समिती शेतकऱ्यांसाठी खुली केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे.
![मंगरुळपीर बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा यशस्वी प्रयोग Market](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6811687-12-6811687-1587016155178.jpg)
मोबाईलच्या माध्यमातून अगोदर बुकिंग केली जाते. त्यानंतर ज्या शेतकऱयांचा नंबर आला आहे त्यांना शेतीमाल बाजार समितीत घेऊन येण्यास सांगितले जाते. त्यामुळे बाजार समितीत एका वेळी ठराविकच संख्येत शेतकरी येतात. परिणामी गर्दी होत नाही.
अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. नोंदणीकरून शेतकऱ्यांना बोलावणारी राज्यातील ही पाहिलीच बाजार समिती ठरली. मंगरुळपीर बाजार समितीप्रमाणे इतर बाजार समित्यांनीही हा प्रयोग केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव न पसरता शेतीमालाची विक्री करता येणार आहे.