वाशिम - जिल्ह्यातील वारा जहांगीर येथे गेल्या काही महिन्यापासून श्वानांना (कुत्र्यांना)खरुज (Fungale Diseases ) या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे श्वानाच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्यात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन या आजाराची लागण झालेल्या श्वानांवर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
वाशिम : भटक्या कुत्र्याच्या संसर्गजन्य रोगांची नागरिकांना होतेय लागण - street
भटक्या कुत्र्यांना खरुज हा आजार होत असल्याने त्यांच्या अंगावरील केस गळून जात आहेत. त्यांची त्वचा लालसर, काळसर व कोरडी पडत आहे. गावातील शेकडो भटके कुत्रे जागोजागी दिसून येत आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागण होत आहे.
भटक्या कुत्र्यांना खरुज हा आजार होत असल्याने त्यांच्या अंगावरील केस गळून जात आहेत. त्यांची त्वचा लालसर, काळसर व कोरडी पडत आहे. गावातील शेकडो भटके कुत्रे जागोजागी दिसून येत आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागण होत आहे. आतापर्यंत अनेक जणांना याची बाधा झाली असून काही वयोवृद्धांना त्वचारोगामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रुग्णांना उपचाराकरिता वारा जहांगीर येथून वाशिमला जावे लागत आहे. गावातील नागरिकांच्या या समस्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गावातील उपकेंद्र सुरू करण्याची मागणी सरपंच राजू पायघन यांनी केली आहे.