वाशिम - लग्नाचे वऱहाड मंगळूरपीर येथून वाशिम येथे जाण्याकरिता लक्झरीमध्ये निघाले होते. मंगळूरपीरजवळ लक्झरी पोहचली असता तेथे अपघात झाला होता. लक्झरी चालकाने वाट मोकळी करुन देण्याची मागणी केली असता काहीजणांनी लक्झरीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसवर दगडफेक, ८ जण जखमी
टिप्पर चालक आणि लक्झरी चालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यानंतर काहीजणांनी लक्झरीवर दगडफेक केली.
मंगळूरपीर येथून ४ किमी अंतरावर असलेल्या दस्तापूर फाट्याजवळ काम सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर टिप्पर आणि दुचाकीस्वाराची चकमक झाली. त्यावेळी वरातीची लक्झरी तेथून जाण्याकरिता मार्ग मोकळा करा अशी विनंती करण्याकरिता लक्झरी चालक गेला होता. दरम्यान, टिप्पर चालक आणि लक्झरी चालक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.
हा वाद चिघळल्याने काही जणांनी ट्रॅव्हल्सवर दगडफेक केली. या दगडफेकीमुळे ट्रॅव्हल्समधील ५ पुरुष आणि ३ महिला दगड लागल्याने जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधिक तपास करत आहेत.