वाशिम- सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद' ला वाशिम जिल्ह्यातील कारंजा व रिसोडमध्ये गालबोट लागले. रॅलीवेळी या दोन्ही शहरांमध्ये दुकानांवर दगडफेक करण्यात आली आहे.
कारंजा, रिसोडमध्ये 'भारत बंद'ला गालबोट'; दुकानांवर दगडफेक - risode karanja
वाशिम व मालेगाव शहरात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान, कारंजा व रिसोड शहरात या बंदला गालबोट लागले. कारंजा शहरात रॅली दरम्यान काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली.`
वाशिम व मालेगाव शहरात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान, कारंजा व रिसोड शहरात या बंदला गालबोट लागले. कारंजा शहरात रॅली दरम्यान काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या बंदला हिंसक वळण लागल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानासमोर उभ्या असलेल्या काही वाहनांवर दगडफेक केल्याने वाहनांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. कारंजा शहरात तणावपूर्ण शांतता असून , पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रिसोड शहरातही पुकारलेल्या बंदला दुपारच्या सुमारास गालबोट लागले. येथेही काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली आहे.