मालेगाव पोलीस ठाण्यात विघ्नहर्ता फाऊंडेशनच्यावतीने निर्जंतुकीकरण कक्ष - corona update washim
कोरोनाच्या संसर्गाची लागण पोलिसांनासुद्धा होऊ शकते. याची दखल घेत मालेगावमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विघ्नहर्ता फाऊंडेशनच्या वतीने पोलीस बांधवांकरिता पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला.
मालेगाव पोलीस
वाशिम - कुठल्याही बिकट प्रसंगी प्राणपणाला लावून नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांचे कोरोनाच्या संसर्गापासून रक्षण व्हावे, या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्यात विघ्नहर्ता फाऊंडेशच्या वतीने निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यात आला आहे.