वाशिम- सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एका सराफा दुकानातील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना कांरजा तालुक्यातील कामरगाव येथे घडली आहे. या तिजोरीत 20 ते 22 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असल्याची माहिती आहे. राजेश वर्मा, यांच्या दुकानात ही चोरी झाली आहे.
सीसीटीव्ही फोडले, कुत्र्यांना गुंगीचं औषध घालून चोरट्यांचा सराफा दुकानावर डल्ला - कामरगाव
सोन्या चांदीच्या दागिन्यासह एका सराफा दुकानातील तिजोरी अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना कांरजा तालुक्यातील कामरगाव येथे घडली आहे.
![सीसीटीव्ही फोडले, कुत्र्यांना गुंगीचं औषध घालून चोरट्यांचा सराफा दुकानावर डल्ला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3612989-thumbnail-3x2-wsm.jpg)
दरम्यान, चोरट्यांनी ओळख पटू नये, यासाठी दुकान परिसरातील 5 सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले आहेत. हे चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दुकानासमोरील कुत्र्यांना गुंगीचे औषध दिले होते.
या चोरट्यांनी आणखी 2 सराफा दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदर दुकानांच्या शटरला कुलूप असल्याने शटर चोरट्यांना उघडता आले नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश सोनुने, धनज पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिषीर मानकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी चोरांचा शोध घेण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.