महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी - स्वाभिमानी शेतकरी संघटना

रिसोड तालुक्यातील बंद असलेला बालाजी साखर कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करावा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

By

Published : Aug 25, 2019, 4:55 PM IST

वाशिम -रिसोड तालुक्यातील बालाजी साखर कारखाना सध्या बंद आहे. हा कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रिसोड-मालेगाव रस्त्यावर केशव नगर येथे बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावून हे आंदोलन करण्यात आले.

रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करावा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
बालाजी साखर कारखाना नव्याने सुरू केल्यास निव्वळ कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील बेरोजगार मजुरांच्या हाताला काम मिळेल. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details