महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : बैलगाडीतून...शाळेला चाललो आम्ही; संपामुळे बस बंदचा विद्यार्थ्यांना फटका - st workers strike student going school in bullock cart

एसटी र्मचारी संपावर असल्याने मालेगाव तालुक्यातील आवरदरी येथील उमेश आंधळे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याकरिता आपली बैलगाडी सुरू केली आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची सोय झाली आहे. मात्र, अशा अनेक डोंगराळ भागात साधी बैलगाडी जात नसल्याने विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (student going school in bullock cart washim)

st workers strike, student going school in bullock cart washim
बैलगाडीतून...शाळेला चाललो आम्ही; संपामुळे बस बंदचा विद्यार्थ्यांना फटका

By

Published : Nov 23, 2021, 6:00 PM IST

Updated : Nov 23, 2021, 7:51 PM IST

वाशिम - एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. (st workers strike) संपावर तोडगा निघाला नसल्याने याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसलेला दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील आवरदरी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाण्या-येण्यासाठी मानवमिशनच्या बसेस चालतात. (manav mission bus) मात्र, हे सर्वच कर्मचारी संपावर असल्याने मालेगाव तालुक्यातील आवरदरी येथील उमेश आंधळे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याकरिता आपली बैलगाडी सुरू केली आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची सोय झाली आहे. मात्र, अशा अनेक डोंगराळ भागात साधी बैलगाडी जात नसल्याने विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (student going school in bullock cart washim)

प्रतिक्रिया

विद्यार्थी चिंतेत -

मागील काही दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सरकारने सुरू केल्या आहेत. मात्र, एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे शाळेत जाण्याचा विद्यार्थ्यांचा मार्ग खडतर झाला आहे. ज्या ठिकाणी खासगी बस जातात. तेथून जास्त पैसे मोजून विद्यार्थी शाळेत जाणे-येणे करतात. मात्र, जिथे खासगी वाहनही जात नाही. तेथील विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.

मालेगाव तालुक्यातील जऊळका हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजूबाजूच्या किमान 5 ते 6 गावातील विद्यार्थी श्री शिवाजी विद्यालयात येतात. मात्र, पर्याय उपलब्ध नसल्याने आवरदरी येथील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बैलगाडीतुन करावा लागत आहे. एसटी बससेवा बंद असल्यामुळे खासगी वाहनांनी प्रवास होत आहे. मात्र, खासगी वाहन जास्त करून खेड्यात जात नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. परिवहन विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन संपावर तोडगा काढावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

हेही वाचा -ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

Last Updated : Nov 23, 2021, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details