वाशिम - गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पगार थकल्याने एसटी कर्मचारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सोमवारी राज्यभर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी आक्रोश आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर वाशिममध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आंदोलन केले.
थकीत वेतनाच्या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन - थकीत वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, वाशिम
गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पगार थकल्याने एसटी कर्मचारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सोमवारी राज्यभर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनाच्या मागणीसाठी आक्रोश आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर वाशिममध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आंदोलन केले.
एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे येणारी दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता आम्ही काम केले. मात्र अजूनही वेतन मिळाले नाही. शासनाने आमचे थकीत वेतन द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान या आक्रोश आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हातात फलक घेऊन, सरकारचा निषेध केला.
हेही वाचा -'आमच्या हक्काचा पगार द्या'; नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब आंदोलन