वाशिम - स्त्री भ्रूण हत्या थांबून मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सरकारकडून 'बेटी बचाव बेटी पढाओ' सारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. मात्र, मुलींचा जन्मदर वाढत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यावरच उपाय म्हणून मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील महिला सरपंचांनी गावात मुलगी जन्मताच तिच्या नावे एक हजार रुपये बँकेत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गावातील महिलांना विमा कवच तसेच विधवा महिलांना मोफत रेशन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सरपंच पदाची धुरा सांभाळताच घेतला निर्णय
मानोरा तालुक्यातील कारखेडा हे 2 हजार 700 लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असल्याने मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी यंदा नव्याने सरपंच झालेल्या सोनाली सोळंके यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच मासीक सभेत मुलींचा जन्मदर वाढणे तसेच महिलांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.
कर भरणाऱ्यांना मोफत दळण