वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 4 हजार 120 रुपये दर !
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 4 हजार 120 रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..
वाशिम - सोयाबीन काढणीच्या तोंडावर पाऊस आल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. मात्र पावसाआधी काढणी झालेल्या सोयाबीनला वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत 4 हजार 120 रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..
वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे. सोयाबीनला शासकीय आधारभूत किंमत 3 हजार 880 रुपये आहे. मात्र वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला 4 हजार 120 रुपये दर मिळत आहे.
बाजार समितीत शनिवारी 4 हजार 195 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. दर हमीभावपेक्षा जास्त मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर भविष्यात सोयाबीनचे दर आणखी वाढणार असल्याचे कृषी तज्ञांचे मत असल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला जास्त दर मिळत असला तरी, पावसामुळं काही ठिकाणी सोयाबीन पीकचा दर्जा घसरल्याने त्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.