महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बंदोबस्तावरील 170हून अधिक पोलिसांची रोज खाण्या-पिण्याची सोय

लॉकडाऊनमुळे शहरातील प्रत्येक चौकात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस बांधव डोळयात तेल घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या सर्व पोलीस बांधवांची सेवाभावी वृत्तीने काळजी घेणारे काही हात समोर येत आहेत.

वाशिम
वाशिम

By

Published : Apr 16, 2020, 8:24 PM IST

वाशिम- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून शहरातील प्रत्येक चौकात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस बांधव डोळयात तेल घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. या सर्व पोलीस बांधवांची सेवाभावी वृत्तीने काळजी घेणारे काही हात समोर येत आहेत. यात राजू पाटील-राजे यांचेही नाव घ्यावे लागेल..

वाशिम

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून प्रत्येक बंदोबस्ताच्या ठिकाणी पाटील एक थंड पाण्याचे कॅन आणि चांगल्या दर्जाचे जेवण रोज पोलिसांना पोहोचवत आहेत. विशेष म्हणजे याचा फोटो किंवा काहीच प्रसिद्धी नाही. मात्र, बंदोबस्तावरील पोलीस बांधवांना वेळेवर जेवण आणि पाणी मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. कोणतीही जाहिरातबाजी न करता जवळपास 170हून अधिक पोलिसांना रोज जेवण-पाण्याची सोय ते करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details