महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसतानाही 'या' जिल्ह्यातील काही भाग 'सील'

वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झाला असून खबरदारी म्हणून कारंजा येथील यशोदा नगरमधील नागरिकांनी आपला परिसर सील करून बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश बंद केला आहे.

सील केलेला भाग
सील केलेला भाग

By

Published : May 2, 2020, 4:00 PM IST

वाशिम- राज्यात ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात वाढ होत असलेले क्षेत्र हॉटस्पॉट म्हणून सील करण्यात येत आहेत. तरीही काही नागरिक नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. मात्र, वाशिम जिल्हा कोरोनामुक्त होऊन ही येथे नियमांचे तंतोतंत पालन करत असल्याचे चित्र दिसत आहे. कारंजा येथील यशोदा नगरमधील नागरिकांनी आपला परिसर सील करून बाहेरून येणाऱ्या लोकांना प्रवेश बंद केला आहे.

कारंजा येथील यशोदा नगर सील
या यशोदा नगरमधील नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी एका घरातून केवळ एकच व्यक्तीने बाहेर पडेल असा निर्धार केला आहे. त्यामुळे वाशिम जिल्हा इतर जिल्ह्यापुढे लॉकडाऊन काळात आदर्श घालून देत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details